भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:नरेंद्र मोदी २०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली.[] त्या योजनेनुसार:

  • दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून (००.००तास) भारतातील सर्व बँकांचे एटीएम बंद राहतील. ते दि. ९ व १० नोव्हेंबरलादेखील बंद असतील.[][]
  • भारतातील सर्व बँका दि.९ नोव्हेंबर २०१६ला बंद राहतील.[]
  • दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून सध्या भारताच्या चलनात असलेल्या रु. ५०० व १००० च्या सर्व नोटा व्यवहारासाठी बंद करण्यात आल्या आहेत.[]
  • लवकरच रु.५०० च्या व २००० च्या नवीन नोटा भारताच्या चलनात व व्यवहारात येतील. या नोटा विशेष प्रकारच्या असतील.[][][][]
  • कोणीही नागरिक त्याचेजवळ असलेल्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा दि. १० नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कोणत्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकेल, व त्याऐवजी पर्यायी चलन प्राप्त करू शकेल.[]
  • त्यानंतर या नोटा दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत एक प्रतिज्ञापत्र भरून रिझर्व बँकेत जमा करता येतील.[]
  • सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात ११ नोव्हेंबर २०१६पर्यंत जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.[]
  • नोटा बँकेत अथवा पोस्टात बदलण्यासाठी/जमा करण्यासाठी आधार कार्ड/पॅन कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे.[]
  • याद्वारे खोट्या चलनालापण रोध बसणार आहे.[]
  • काळ्या पैशावर, भ्रष्टाचारावर तसेच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बनावट नोटांच्या परिचलनावर याद्वारे आळा बसू शकेल. त्यासोबतच, हत्यारांच्या स्मगलिंकरिताच्या निधीवर, हेरगिरीवर आणि दहशतवादावरही नियंत्रण येईल असा भारत सरकारचा दावा आहे.[]

यामुळे भारतातील अनेकांना आपली बेहिशेबी संपत्ती नाईलाजाने बँकेत जमा करावी लागली. त्यांची मोठीच पंचाईत झाली.

पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:भारतातील शासकीय योजना

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. २.० २.१ २.२ २.३ २.४ २.५ २.६ २.७ २.८ साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (आर्थिक कर्म विभाग)चे असाधारण राजपत्र क्रमांक-भाग II-खण्ड३-उप-खण्ड (ii) नवी दिल्ली येथे ८ नोव्हेंबर २०१६ ला प्रकाशित
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:स्रोत बातमी