Jump to content

जिग्नेश मेवाणी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विधानसभा सदस्य

जिग्नेश नटरवलाल मेवाणी (गुजराती : જિગ્નેશ નટવરલાલ મેવાણી) हे गुजरात मधील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील आहेत. ते दलित समाजाचे तरूण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून १८,१५० मतांनी निवडून गेले.

सुरुवातीचे जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

जिग्नेश यांचा जन्म ११ डिसेंबर १९८२ साली गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला. मेहसाणा जिल्ह्यातील मेऊ हे त्यांच्या परिवाराचे मूळ गाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबादमधील स्वस्तिक विद्यालय व विश्व विद्यालय माध्यमिक शाळा येथे झाले. त्यांनी २००३ साली एच.के. आर्ट्स कॉलेज येथून इंग्लिश साहित्य या विषयात कला शाखेची पदवी मिळवली. २००४ साली त्यांनी पत्रकारिता व जनसंचार या विषयात डिप्लोमा प्राप्त केला. २००४ ते २००७ या काळात त्यांनी अभियान या गुजराती साप्ताहिकात वार्ताहर म्हणून काम केले. २०१३ साली त्यांनी डी.टी. लॉ कॉलेज, अहमदाबाद येथून एल.एल.बी. करून विधि शाखेची पदवी मिळवली.

चळवळ[संपादन | स्रोत संपादित करा]

२०१६ साली गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उना गावात स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्या एका गटाकडून काही दलित पुरुषांवर हल्ला झाला होता व ह्या घटनेची चित्रफीत काढून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती. ह्या घटनेचा गुजरातमध्ये तीव्र निषेध झाला. ह्याचाच एक भाग म्हणून अहमदाबाद ते उना या मार्गावरून दलित अस्मिता यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी यांनी केले. १५ ऑगस्ट २०१६ रोजी यात्रेचा समारोप झाला. या कार्यक्रमात जवळपास २०,००० दलित लोक सहभागी झाले, ज्यामध्ये दलित महिलांचाही समावेश होता. सहभागी दलित जनतेने मेलेल्या गाई व ढोरे ओढून नेण्याचे त्यांचे पारंपरिक काम सोडून देण्याची प्रतिज्ञा घेतली. जिग्नेश यांनी दलितांच्या उत्थानासाठी त्यांना जमिनी मिळाव्या ही मागणी उचलून धरली.

हार्दिक पटेलअल्पेश ठाकोर यांसह जिग्नेश मेवाणी यांना गुजरातमधील राजकारणातील नवीन नेते समजले जाते.

२०१७ सालची विधानसभा निवडणूक[संपादन | स्रोत संपादित करा]

२०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जिग्नेश मेवाणी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा १९,६९६ मतांनी पराभव केला आणि ते निवडून आले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी '