बिल क्लिंटन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विल्यम जेफरसन क्लिंटन (इंग्लिश: William Jefferson Clinton), ऊर्फ बिल क्लिंटन (इंग्लिश: Bill Clinton) (ऑगस्ट १९, इ.स. १९४६; होप, आर्कान्सा, अमेरिका - हयात) हा अमेरिकन राजकारणी असून अमेरिकेचा ४२वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९९३ ते २० जानेवारी, इ.स. २००१ या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तत्पूर्वी हा इ.स. १९७९-८१ व इ.स. १९८३-९२, अश्या दोन मुदतींसाठी आर्कान्सा राज्याचा गव्हर्नर होता.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बिल क्लिंटन

अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीचा कालखंडात क्लिंटनाची अध्यक्षीय कारकीर्द झाली. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्याने उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करारावर सही केली, सर्वसाधारण आरोग्यसेवा व बालकांसाठीच्या शासकीय आरोग्य विमा कार्यक्रमात सुधारणा घडवल्या. मॉनिका लेविन्स्की प्रकरणात न्यायालयात खोटा कबुलीजबाब दिल्याबद्दल त्याच्यावर महाभियोग चालवला गेला, मात्र अमेरिकी सेनेटेने त्याला मुभा दिल्यामुळे त्याला अध्यक्षपदाची मुदत पुरी करता आली.

क्लिंटन अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य आहे. त्याची पत्नी हिलरी क्लिंटन हीदेखील डेमोक्रॅट राजकारणी असून ती २१ जानेवारी, इ.स. २००९पासून इ.स. २०१२ पर्यंत अमेरिकेची परराष्ट्रसचिव होती.

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स

साचा:विस्तार साचा:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष