Jump to content

भरत जाधव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता

भरत जाधव हा (१२ डिसेंबर १९७३) हा भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.[]

तो मूळचा कोल्हापूरचे असला तरी त्याचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले.

३००० प्रयोग करणाऱ्या "ऑल द बेस्ट" या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला.[] त्यांने नंतर 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले.[] जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती.जाधव यांनी २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली.[]

भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट आणि ८ मालिका केल्या आहेत. ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. सही रे सही या एकाच नाटकात भरत जाधवने चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले. हे नाटक गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.[]

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.[]

सही रे सही[संपादन | स्रोत संपादित करा]

सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.[]

‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले. गुजराथी नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराथी रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते.

याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.

.

चित्रपट कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

  • खतरनाक (२०००)
  • खबरदार (२००५)
  • गलगले निघाले (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • जत्रा (२००६)
  • डावपेच (२०११)
  • नवऱ्याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • नाना मामा (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • पछाडलेला (२००५)
  • प्राण जाएॅं पर शान न जाएॅं (हिंदी, २००३)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • बाप रे बाप (२००३)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
  • सरीवर सरी (२००५)
  • साडे माडे तीन (२००८)
  • हाऊस फूल (२००४)

नाटक कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

[] []

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]