दूर्वा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:०१, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे.[] या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कुळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.[]ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात हीई मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दूर्वा

औषधी गुणधर्म संपादन

  • दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे.[]
  • उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो.[]
  • त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो.
  • मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो.
  • रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.[]

धार्मिक महत्त्व संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दूर्वा वाहून पूजा केलेला गणपती

हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[] गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात,[] कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते.[] दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.[][१०]

संदर्भ संपादन