श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

स्थापना संपादन

श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन ही श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी याची एक शाखा आहे. श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष यांच्या शिक्षणविषयक संकल्पनांना मूर्त रूप देण्याच्या हेतूने श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी दि. २ डिसेंबर १९४३ रोजी या सेंटरची स्थापना केली. याचे पूर्वीचे नाव श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर असे होते.

वैशिष्ट्य संपादन

येथील शिक्षणपद्धतीचा गाभा समग्र शिक्षण (Integral Education) हा आहे. या पद्धतीस Free Progress Education असेही संबोधले जाते.

नियतकालिक संपादन

श्रीअरविंद आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील बहुतांशी प्रकाशने श्री अरबिंदो आश्रम प्रेसमध्ये छापली जातात. त्यातील एक म्हणजे श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनचे बुलेटिन.त्याचे नाव बुलेटिन ऑफ श्री अरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन - हे बुलेटिन एकाच वेळी इंग्रजी-फ्रेंच मधून प्रकाशित होते. पूर्वी शारीरिक शिक्षणाचे बुलेटिन या नावाने ते प्रकाशित होत असे. हे त्रैमासिक असून, पाँडिचेरी येथून, इ.स. १९४९ पासून प्रकाशित होत आहे.


संदर्भ

  • Collected works of The Mother, Published by Sri Aurobindo Ashram., Vol : 12 : Pg 39-47
  • Principles and Goals of Integral Education by Jugal Kishor Mukharji, ISBN 81-7058-806-5

अधिकृत संकेतस्थळ संपादन