निळोबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ इ.स.च्या १७ व्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शा.श. १५८० (इ.स. १६५८) सालाच्या सुमारास विद्यमान होते[].ते प्रतिवर्षी नाथषष्ठीला पैठणच्या वारीस येत. त्यांनी तुकारामांना गुरुस्थानी मानले होते.

त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले. त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी.

निळोबारायांवरची पुस्तके संपादन

  • झाला निळा पावन (कादंबरिका, लेखक - अशोक देशपांडे)
  • श्री निळोबाराय महाराज (रा.बा. परदेशी, स.प्र. देसाई)

बाह्य दुवे संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:वारकरी संप्रदाय
साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय

  1. महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर