वासंतिक नवरात्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख

वासंतिक नवरात्र हा हिंदू लोकांत, विशेषतः उत्तर भारतात पाळला जाणारा सण आहे. हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि रामनवमीला संपतो. या काळात देवी कात्यायनीची पूजा करतात.

साधारणपणे हे नवरात्र नऊ दिवसांचे असते, पण एखाद्या वर्षी तिथिक्षयामुळे किंवा तिथिवृ्द्धीमुळे आठ किंवा दहा दिवसांचे असू शकते. इ.स. २०१७, २०१८ व २०१९ या तिन्ही वर्षी हे नवरात्र आठ दिवसांचे होते.