Jump to content

भारत माता मंदिर, वाराणसी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४६, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट मंदिरभारतातील वाराणसी येथे काशी विश्वविद्यालयाच्या प्रांगणात भारत माता मंदिर नावाचे एक देऊळ आहे. पारंपरिक हिंदू देवदेवतांच्या मूर्तीऐवजी ह्या मंदिरात भारत मातेचा मोठा नकाशा लावला आहे.

[][][]

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

भारत माता मंदिराचे बांधकाम बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी केले आहे व उद्घाटन १९३६ साली महात्मा गांधींंनी केले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. भारत माता ही फ़ाळणीपूर्व नकाशाच्या रुपात संगमरवरी दगडाने कोरलेली आहे. हा नकाशा अगदी मापात नकाशा बनवण्याच्या तंत्राचा वापर करून सर्व भौगोलिक घटक त्यांच्या वास्तविक आकाराच्या प्रमाणात दाखवतो. []

स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

भारत मातेचे हे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या आवारात (जुने नाव काशी विश्वविद्यालय) आहे. हे वाराणसी रेल्वे स्थानकापासून दीड किमी अंतरावर, तसेच बनारस हिंदू विद्यापीठापासून ६ किमी अंतरावर आहे.[]

अन्य मंदिरे[संपादन | स्रोत संपादित करा]

अशा प्रकारची भारतमातेची मंदिरे इंदूर, उज्जैन, औरंगाबाद, कानपूर, झांशी, दांतिया, हरिद्वार आदि गावांत आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

  • भारत माता
  • हिंदू मंदिरे वाराणसी

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी