Jump to content

जगन्नाथ मंदिर

मराठीपिडिया कडून
103.76.211.26 (चर्चा)द्वारा २३:००, १३ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जगन्नाथ मंदिर

साचा:Location map

चार धामबद्रीनाथरामेश्वरम्
द्वारकापुरी
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पुरी येथील रथयात्रा

जगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओड़िशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.

रथयात्रा[][संपादन | स्रोत संपादित करा]

जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते.[]

ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी व्यवस्था आहे.[] या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात.[]

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी