दाभोसा धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:४१, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धबधबे


दाभोसा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील,जव्हार तालुक्यातील एक बारमाही धबधबा आहे. सुमारे ३०० फूट उंचीचा हा धबधबा जव्हारपासून २० किमी अतरांवर आहे.[]आणि मुंबई पासून १५० किमी अंतरावर आहे.
हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कडय़ावरून कोसळणारी दाभोसाची पांढरीशुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. पायवाटेने तोल सांभाळत, जरा घसरत, दरीत उतरल्यानंतर काना-मनात भरून राहतो तो धबधब्याच्या धारेचा धीरगंभीर नाद, ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा तो नाद नंतरही कानात गुंजत राहतो.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन