निवळीचा धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

निवळीचा धबधबा हा मुंबई- गोवा महामार्गाने रत्‍नागिरीकडे जाताना संगमेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहिल्यास दिसतो. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. (रत्‍नागिरी-निवळी अंतर १८ किलोमीटर आहे.)