Jump to content

परमवीर चक्र पुरस्कार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय पुरस्कार परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.

ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊॅं रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली.

विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

१९४८ चे भारत-पाक युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
मेजर सोमनाथ शर्मा चौथी बटालियन, कुमाऊॅं रेजिमेंट नोव्हेंबर ३, १९४७ बडगाम, काश्मीर
लान्स नायक करम सिंह १ बटालियन, शीख रेजिमेंट ऑक्टोबर १३, १९४८ टिथवाल, काश्मीर
नायक यदुनाथ सिंग १ बटालियन, राजपूत रेजिमेंट फेब्रुवारी, १९४८ नौशेरा, काश्मीर
सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे इंडियन कोर ऑफ इंजिनियर्स एप्रिल ८, १९४८ नौशेरा, काश्मीर
कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत ६ बटालियन, राजपूताना रायफल्स १७-जुलै १८, १९४८ टिथवाल, काश्मीर

संयुक्त राष्ट्र शांतिसेनेच्या कारवाया[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया ३ बटालियन, १ गुरखा रायफल्स डिसेंबर ५, १९६१ एलिझाबेथ व्हिलेज, काटंगा, कॉंगो, आफ्रिका

१९६२ चेभारत-चीन युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
मेजर धनसिंग थापा १ बटालियन, १ गुरखा रायफल्स ऑक्टोबर २०, १९६२ लद्दाख, भारत
सुबेदार जोगिंदर सिंग १ बटालियन, शीख रेजिमेंट ऑक्टोबर २३, १९६२ तोंगपेन ला, नॉर्थईस्ट फ्रंटियर एजन्सी, भारत
मेजर शैतान सिंग १३ बटालियन, कुमाऊॅं रेजिमेंट नोव्हेंबर १८, १९६२ रेजांग ला, नॉर्थईस्ट फ्रंटियर एजन्सी, भारत

१९६५ चे भारत-पाक युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद ४ बटालियन, बॉम्बे ग्रेनेडियर्स सप्टेंबर १०, १९६५ चीमा, खेमकरण, भारत
लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोर द पूना हॉर्सेस ऑक्टोबर १५, १९६५ फिलौरा, सियालकोट, पंजाब, भारत

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
लान्स नायक आल्बर्ट एक्का १४ बटालियन, बिहार रेजिमेंट डिसेंबर ३, १९७१ गंगासागर, बोग्रा, बांगलादेश
फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह शेखों १८ स्क्वॉड्रन, भारतीय वायुसेना डिसेंबर १४, १९७१ श्रीनगर, काश्मीर, भारत
लेफ्टनंट अरुण खेतरपाल द पूना हॉर्सेस डिसेंबर १६, १९७१ जरपाल, बारापिंड, पाकिस्तान
मेजर होशियार सिंह ३ बटालियन बॉम्बे ग्रेनेडियर्स डिसेंबर १७, १९७१ बसंतार, पाकिस्तान

१९८७चा सियाचीन संघर्ष[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
नायब सूबेदार बन्ना सिंग ८ बटालियन, जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री जून २३, १९८७ सियाचिन हिमनदी, भारत

भारतीय शांतिसेनेच्या कारवाया[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
मेजर रामस्वामी परमेश्वरन ८ बटालियन, महार रेजिमेंट नोव्हेंबर २५, १९८७ जाफना प्रांत, श्रीलंका

कारगिल युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सैन्यपथक तारीख युद्धभूमी
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे १ बटालियन, ११ गुरखा रायफल्स जुलै ३, १९९९ जुबेर टाप, बटालिक सेक्टर, काश्मीर, भारत
ग्रेनेडियर योगेन्द्र सिंह यादव १८ बटालियन, द ग्रेनेडियर्स जुलै ४, १९९९ टायगर हिल, कारगिल, काश्मीर, भारत
रायफलमन संजय कुमार १३ बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स जुलै ५, १९९९ फ्लॅट टॉप, कारगिल, काश्मीर, भारत
कॅप्टन विक्रम बात्रा १३ बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स जुलै ६, १९९९ पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल, काश्मीर, भारत

परमवीरचक्र मिळालेल्या वीरांवरच्या पुस्तकांची नावे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • परमवीर गाथा भाग १ ते ८. (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)
  •  मासिक ऋग्वेद दीपावली विशेषांक नोव्हेंबर- २०१८..!

परमवीरचक्र, महावीर चक्र आदी शौर्यचक्रे मिळवाणाऱ्या वीरांच्या गोष्टी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • शौर्यगाथा (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)

साचा:भारतीय सम्मान व पुरस्कार साचा:विस्तार