गुरबचन सिंग सलारिया

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया (२९ नोव्हेंबर, १९३५:शकरगढ, पंजाब - ५ डिसेंबर, १९६१:काँगोचे प्रजासत्ताक) हे भारतीय सैन्याधिकारी होते. हे १९६१ च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकातील अधिकारी होते. तेथील युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान मरणोत्तर देण्यात आला.