Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
कारंजा-सोहोळ अभयारण्य - मराठीपिडिया

कारंजा-सोहोळ अभयारण्य

साचा:बदल कारंजा-सोहोळ अभयारण्य हे वाशीम जिल्ह्यातील सुमारे १८ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे.

कारंजा-सोहोळ हे काळव‌िटांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. काळव‌िटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळव‌िटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा-सोहोळ या काळवीट अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान आणि झुडुपी जंगल झाले आहे. त्यामुळे आपल्याला येथे काळवीट, नीलगाय, रानडुक्कर दिसून येते.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कारंजा-सोहोळ अभयारण्य

भौगोलिक स्थान संपादन

  • कारंजा-सोहोळ अभयारण्य हे पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यात असून कारंजा पासून मानोरा रोड वर ७.४ कि. मी. अंतरावर आहे.
  • कारंजा-सोहोळ हे अभयारण्य १८.३१ चौ.कि.मी. परिसरात पसरलेले आहे.
  • कारंजा परिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव व सोमठाणा नियतक्षेत्राचा 781.4 हेक्टर वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश केला आहे.
  • कारंजा सोहोळअभयारण्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे तसेच, पश्चिमेस मंगरुळपीर तालुक्याची सीमा आहे.
  • उत्तरेस कारंजा तालुक्यातील उंबर्डा, दादगांव, पिंपळखेड, गिर्डा, मलकापूरच, मिर्झापूरची शेतीची हद्द आहे. दक्षिणेस अडाण नदी आणि मानोरा तालुक्याची हद्द आहे.[]
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सोहोळ अभयारण्याचे दृश्य

वैशिष्ट्य संपादन

कारंजा सोहोळ अभयारण्य हे मुख्यत: काळव‌िटांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच २००० साली या अभयारण्याला माळरानास अभयारण्य म्हणून घोषित केले होते.

  1. या अभयारण्यात काळवीट, रानडुक्कर, कोल्हा, नीलगाय, रानमांजर यांचे यांचे अस्तित्व आहे. कारण अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ प्रदेश असून, पर्यटकांना दूरवर नजर टाकून निसर्गाचा आनंद घेणे सहज शक्य आहे.
  2. या अभयारण्यात प्राण्यांव्यातीरिक वृक्ष सुद्धा आढळून येतात जसे कि पळस, बेहडा, काटसावर, मोहा, कळंब, खैर, इत्यादी वृक्ष प्रजाती आढळतात.
  3. तसेच या अभयारण्यात जवळपास १४५ प्रजातींचे पक्षी आपल्याला दिसून येते.
  4. जंगलात गेल्यानंतर किती वन्यप्राणी नैसार्गिक दृश्य दिसतील, असा प्रश्न वन पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतोच. कारण अनेकदा दिवसभर वनभ्रमंती केल्यानंतरही पदरी निराशाच पडत असते, मात्र, सुटीत नजीकच्या कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्यास भेट दिल्यास आपल्याला नक्कीचआनंद मिळू शकेल. कारण येथे बाराही महिने काळवीट, नीलगाय, रानडुक्कर यांचे अस्तित्व असते.
  5. या अभयारण्याला ‘गवती माळरान’ असेही ओळखले जाते. काळवीट हा प्राणी साधारणतः गवती माळरांनावर आढळला जातो. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान न राहता झुडुपी जंगल झाले आहे.
  6. गवती माळरान या प्रकारात या अभयारण्याची गणना केली जाते.[]


संदर्भ संपादन