भाविना पटेल
भाविना हसमुखभाई पटेल (६ नोव्हेंबर १९८६) ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिसपटू आहे.[१] ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने टोकियो येथे २०२० च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले.[२] निकुल पटेल हे तिचे प्रशिक्षक आहेत.[३]
कारकीर्द संपादन
व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळणाऱ्या भाविनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत.
२०११ मध्ये आयोजित पीटीटी थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक श्रेणीमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकून तिने जागतिक क्रमांक २ चेरँकिंग गाठले. ऑक्टोबर २०१३ मध्ये, पटेलने बीजिंगमधील आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये रौप्य पदक जिंकले.
२३ ते ३१ ऑगस्ट २०१७ रोजी बीजिंग, चीन येथे भाविनाने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.
टोकियो २०२० पॅरालिम्पिक संपादन
टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये तिने जागतिक क्रमांक २ वर असलेल्या आणि रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बोरिस्लावा रॅन्कोविचला पराभूत करून महिला एकेरीच्या वर्ग ४ वर्गात उपांत्य फेरी गाठली. तिने अंतिम फेरी गाठण्यासाठी चीनच्या झांग मियाओलाही पराभूत केले आणि सध्याच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगच्या विरोधात ती सुवर्णपदक लढतीत हरली आणि तिला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरस्कार संपादन
- अर्जुन पुरस्कार (२०२१)[४]