Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
वासिष्ठीपुत्र पुलुमावी - मराठीपिडिया Jump to content

वासिष्ठीपुत्र पुलुमावी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ब्रिटिश संग्रहालयात असलेले वासिष्ठीपुत्र पुलुमावीचे चांदीचे नाणे

वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

याच्या कारकिर्दीत क्षत्रपांनी उठाव करून नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेश व उत्तर कोकण जिंकून घेतले. वासिष्ठीपुत्र पुलुमावी आणि रूद्रदामन (उज्जैनचा क्षत्रप राजा) यांच्यात दोनदा युद्ध झाले. या दोन्ही युद्धांत रूद्रदामनाने वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा पराभव केला. परंतु त्याची कन्या वासिष्ठीपुत्र सातकर्णीस (पुलुमावीचा धाकटा भाऊ) दिलेली असल्याने क्षत्रपांनी तडजोड करून घेतली. वासिष्ठीपुत्र पुलुमावीने स्वतःचा मुखवटा असलेली चांदीची नाणी प्रचारात आणली.

संकीर्ण[संपादन | स्रोत संपादित करा]

टॉलेमी या ग्रीक प्रवाशाने प्रतिष्ठानचा सम्राट म्हणून वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा (ग्रीकः सिरिस्तोलेमयोस, अर्थात श्री पुलुमायी) उल्लेख केलेला आहेसाचा:संदर्भ हवा.

साचा:विस्तार साचा:सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते