संतोष दानवे
Appearance
संतोष रावसाहेब दानवे (जन्म १५ डिसेंबर १९८६) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी, आणि भोकरदन मतदार संघामधील आमदार आहेत. ते १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण सदस्य होते.[१][२] ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.
प्रारंभिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
दानवे हे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत.[३] भोकरदन येथील मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली.
वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
दानवे यांनी मराठी संगीतकार राजेश सरकटे यांची मुलगी रेणू सरकटे यांच्याशी मार्च २०१७ मध्ये लग्न केले.[४]