Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
३३ कोटी देव - मराठीपिडिया

३३ कोटि देव म्हणजे ३३ उच्च देव. संस्कृत भाषेत 'कोटि' या शब्दाचा अर्थ करोड (१,००,००,०००) असा होत नाही तर हा शब्द 'उच्चतम, सर्वोच्च व अत्यंत' असा म्हणून वापरला जातो. शून्याच्या शोधानंतर भारतीय गणितज्ञांनी मोठ्यात मोठ्या संख्या लिहिणास सुरुवात केली, त्यांना नाव देताना मोठी संख्या म्हणून १,००,००,०००ला कोटी असे नाव रूढ झाले. पण हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी (३३,००,००,०००) ही देवतांची संख्या नसून, ३३ प्रकारचे उच्च देव आहेत. सामान्य भाषेत कोटी शब्दाचा दुसरा अर्थ कोटी (१,००,००,०००) असल्यामुळे ३३ करोड देवी देवता असल्याची मान्यता प्रख्यात झाली.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
व्योममंडलाचा भाग ज्यावर रुद्र दर्शवली आहेत - साधारण ५व्या शतकातील, कात्रा केशव देव; सध्या मथुरा संग्रहालय.

या ३३ कोटी देवी-देवांमध्ये आठ वासू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती समाविष्ट आहे आणि दोन अश्विनीकुमारांना ३३ कोटी देवांमध्ये समाविष्ट केले आहे.

  • बारा आदित्यांची नावे: १. अंशमान (हिस्सा), २. अर्यमन (श्रेष्ठता), ३. इंद्र/शक्र (नेत्रत्व), ४. त्वष्टृ (कौशल्य/कला/शिल्प), ५. पर्जन्य, ६. पूषन (समृद्धि), ७. भग (धरोहर), ८. मित्र (मित्रता/ सहयोगी), ९. वरूण (भाग्य), १०. विवस्वत् (सामाजिक नियम), ११. विष्णू/वामन (ब्रम्हांडीय नियम), १२. धाता / प्रजापति
  • अकरा रुद्रांची नावे:

- पाच अमूर्तः १.आनंद, २. विज्ञान (ज्ञान), ३. मानस (विचार), ४. प्राण (श्वास किंवा जीवन), ५. वाक - (भाषण).

- शिवाची पाच नावेः १. ईशान (वैभव), २. तत्पुरुष, ३. सद्योजात (नवजात किंवा जन्म घेतलेला), ४. वामदेव, ५. अघोरा

- आणि आत्मा

  • दोन अश्विनीकुमार

- असे एकूण: ८+११+१२+२ = ३३.[][][]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:३३ कोटी देव