Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
टिळक स्मारक मंदिर - मराठीपिडिया Jump to content

टिळक स्मारक मंदिर

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

टिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.

प्रकल्प[संपादन | स्रोत संपादित करा]

टिळक स्मारक मंदिराच्या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • सेमिनार कक्ष (तळमजला)
  • प्रेक्षागृह (पहिला मजला) - ९०१ आसनी

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम १९७२-१९७६ सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख रुपये खर्च आला. गोपाळराव देऊसकरांनी घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे. टिळक महाविद्यालय , वैदिक संशोधन मंडळ, काँग्रेस स्वराज्य पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष(स्त्री शाखा), आशा अनेक संस्थांना मंदिराने जागा वापरण्यास दिली. वसंतव्याख्यानमालेचे वासंतिक ज्ञानसत्र सन १९३३ ते १९५६ या कालावधीत मंदिराच्या आवारात भरत असे. याच काळात महात्मा गांधी, मनमोहन मालवीय, भाई परमानंद, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, आशा विख्यात व्यक्तींनी मंदिरास भेटी दिल्या आहेत. १ ऑगस्ट१९३७ रोजी मंदिरासमोरील व आसपासची ८९६०चौ. फूट जागा जग्गानाथ महाराज यांच्या कडून विकत घेतली. सन १९५८ मध्ये लोकमान्यांचे नातू आणि केसरीचे संपादक विश्वस्त श्री. जयंतराव टिळक हे मंदिराचे अध्यक्ष झाले. सन १९७५ मध्ये चित्रकार गोपाळ देऊस्कर यांनी लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा भिंतीवर उभारला आहे. या नूतन वस्तूसाठी अंदाजे ३० लक्ष रुपये एवढा खर्च झाला.