Jump to content

पातोळ्या

मराठीपिडिया कडून

पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे.[] []पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात.[] कोकणात गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे.[][][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पातोळ्या(कोकणातील एक पक्वान्न)

साहित्य आणि कृती[संपादन | स्रोत संपादित करा]

हळदीची पाने

तांदूळ पीठ

खोवलेला नारळ

गूळ

मीठ

तेल

तूप

वेलची पूड

कृती-

  • पाणी उकळत ठेवून त्यात मीठ व तेल घालावे.
  • पाण्याला उकळी आल्यावे त्यात पाण्याच्या सम प्रमाणात तांदूळ पिठी घालावी आणि झाकण ठेवावे.
  • वाफ आल्यावर धग बंद करावी.
  • उकड कोमट असताना मळून घ्यावी.
  • नारळाचा चव आणि गूळ, वेलची पूड कढईत घ्यावे आणि मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  • हे मिश्रण फार घट्ट करू नये, सैलसर ठेवावे.
  • हळदीच्या पानाला तेल अथवा तूप लावून त्यावर उकडीचा गोळा थापून पसरवून घ्यावा.
  • त्यावर तयार सारण पसरवून घ्यावे आणि हळदीचे पान एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे दुमडून घ्यावे.
  • नंतर ही पाने वाफवून घ्यावीत आणि गरम पातोळे तुपासह खायला द्यावे. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]