साचा:अर्धसुरक्षीत

साचा:माहितीचौकट समूह

मांग किंवा मातंग हा भारतातील अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे. या जातीसमुहाला मध्ययुगीन काळात बहिष्कृत (अस्पृश्य) मानले गेले होते. या समुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख असावी.

मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यांत मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[][]

इतिहास संपादन

शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ संपादन

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ संपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबत मातंगांचाही सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनातही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सुमारे १०,००० मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

व्यवसाय संपादन

मातंग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात.केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मातंगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते; पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रुपांतरीत झाले.

गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती . मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते . 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण होती.आज २१ व्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे.

मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज २१व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे.

लोकसंख्या संपादन

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी २०,०३,९९६ होती. मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात.

२०१७ पर्यंत, मांग समुदायाला ११ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव, ओडिसा, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आणि तेलंगाणा.

२००१ च्या जनगणनेनुसार मातंगांची लोकसंख्या[]:

धर्म संपादन

मातंग समाज हा पारंपरिकरीत्या हिंदू धर्मीय मानला जातो. याशिवाय मातंगांचा दुसरा एक मोठा गट हा बौद्धधर्मीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतराच्या चळवळीत बऱ्याच मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. मातंगांचा तिसरा एक लहान गट ख्रिश्चन धर्माला मानणारा आहे.[] ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ट होत नाहीत.

पोटजाती संपादन

मांग जातीत १५ पोटजाती आहेत, त्या अशा: मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.

उल्लेखनीय व्यक्ती संपादन

हे सुद्धा पहा संपादन

साचा:संदर्भनोंदी