साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र लक्ष्मीबाई केळकर (माहेरच्या कमल दाते) या राष्ट्रसेविका समिती नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम इत्यादी उपक्रम सुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणीविद्या या विषयावर तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला.[]

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन