कुंवरसिंह
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र कुंवरसिंह हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म इ.स. १७७७ साली जगदिशपूरचे राजा जादासिंह यांच्या कडे झाला होता.
बालपण आणि शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]
कुंवरसिंह यांचे मूळ गाव शहाबाद तालुक्यातील जगदिशपूर. जमीनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून अश्वरोहण, नेमबाजी, भालायुद्ध, तलवारयुद्ध, तिरंदाजी इत्यादी युद्धकलांचे त्यांनी उत्तम शिक्षण प्राप्त केले होते.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
राजा जादासिंहजीच्या मृत्युनंतर जगदिशपूरच्या संस्थानाचा कारभार कुंवरसिंहानी स्वीकारला. १८५६ च्या शेवटच्या काळात इंग्रज सरकारने जगदिशपूरचे संस्थान खालसा केले. कुंवरसिंहानी या अन्यायारोधात लढा देण्याचे ठरविले. दाणापूर-पाटणा भागातील क्रांतिकारकांचे नेतृत्व पत्करून जुलै २९, १८५७ रोजी या ८० वर्षाच्या क्रांतिकारकाने आरानगरवर हल्ला करून ३००हून आधील गोऱ्या सैनिकांना ठार केले.साचा:संदर्भ हवा या युद्धात ते जबर जखमी झाले. २३ मे १८५८ला कुंवरसिंहाचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांचा भाऊ अमरसिंह याने हा लढा पुढे चालू ठेवला.