वडनगर
Appearance
साचा:Infobox settlement वडनगर हे भारताच्या गुजरात राज्यात असलेले मेहसाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म या गावातील आहे.
भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]
वडनगर हे गाव साचा:Coord या आंशिकांवर स्थित आहे.[१] याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १४३ मीटर्स (४६९ फूट) इतकी आहे.
हे गाव खेरालु तालुक्याच्या दक्षिणेस वसलेले आहे.त्याच्या पश्चिमेस उंझा तेलगाह दक्षिणेस विसानगर व विजापूर तेलगाह व पूर्वेस सावरकांठा जिल्हा वसलेला आहे.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार,[२] वडनगरची लोकसंख्या २५,०४१ इतकी होती. यात पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रीयांचे प्रमाण ४९% इतके आहे. या गावाचा सरासरी साक्षरता दर ६५% इतका आहे. पुरुष साक्षरता ७५% तर महिला साक्षरता ५४% इतकी आहे. येथील १३% लोकसंख्या ही ६ वर्षांखालील आहे.