सुब्रमण्यम स्वामी
डॉ. सुब्रमण्यन स्वामी अथवा सुब्रमण्यम स्वामी (१५ सप्टेंबर, इ.स. १९३९,चेन्नई[१] - हयात) एक भारतीय नेता, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व एक अर्थशास्त्रज्ञ आहेत.[२] सध्या ते जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[३]
राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - व्यापार, कायदा व न्याय मंत्री होते.[१]
शैक्षणिक कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]
हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्स व पॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात "इंडेक्स नंबर थेअरी" या विषयावर एक नवीन व पथ प्रदर्शक अध्ययन प्रस्तुत केले. ते हार्वर्ड विद्यापीठात सन्माननीय पाहुणे अध्यापक म्हणून जात असत[२]. २०११ मध्ये त्यांनी इस्लामविषयी लिहिलेल्या लेखामुळे त्यांचे अध्यापन बंद करण्यात आले. [४]
सामाजिक लढा व कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]
त्यांनी कायम आपल्या तत्त्वांसाठी निर्भयपणे संघर्ष केला आहे. आणीबाणी दरम्यान ऐतिहासिक साहसी संघर्ष, तिबेट मधील कैलाश-मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत - चीन संबंधांत सुधारणा, भारत - इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान, इत्यादी काही बाबी त्यांच्या ठळक कार्यांपैकी आहेत.
२ जी तरंग भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई करवण्यात त्यांच्या न्यायालयीन लढाईचा मोठा हात आहे. [५]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
- Kashmir Hindu Foundation interviews Subramaniam Swamy
- Subramaniam Swamy's views on the influence of Hinduism
- An article by Dr. Subramanian Swamy on how to face defamation litigation
- Basic Islam for Hindu Dhimmis – Subramanian Swamy
- The Assassination of Rajiv Gandhi: unanswered questions and unasked queries
- Video Dr.Subramanian Swamy's Views About Sonia Gandhi & Rahul Gandhi
- All about Subramaniam Swamy
- Rise of Subramaniam Swamy in Tamil Nadu politics