साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र वनपर्ति (Wanaparthy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वनपर्ति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे राज्य राजधानी हैदराबादपासून १४९ किमी अंतरावर आहे. वनपर्तिच्या राजाचे महल हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १२,८६६ कुटुंबांसह ६०,९४९ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३१,५०१ पुरुष आणि २९,४४८ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९३५ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ६१२२ आहे जी कामारेड्डीच्या एकूण लोकसंख्येच्या १०.०४% आहे.सरासरी साक्षरता दर ७७.९१% होता.

८३.००% लोक हिंदू आणि (१५.३७%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.०५%), शीख (०.०२%), बौद्ध (०.०३%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.५२%) यांचा समावेश होतो.[][]

तेलुगू वनपर्तिमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[]

भुगोल संपादन

वनपर्ति हे उत्तर अक्षांशाच्या १६°२१′३९.६″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°०३′४५.७२″E वर स्थित आहे. वनपर्तिची सरासरी उंची ३६५ मीटर आहे.[] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३८.६ मिलिमीटर (२५.१४ इंच) आहे.[] हे शहर कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे.

प्रशासन संपादन

वनपर्ति नगरपालिकेची स्थापना ही १९८४ मध्ये करण्यात आली, शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २७.४० चौ.कि.मी. (१०.५७ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३६ प्रभाग आहेत.[] वनपर्ति हे शहर वनपर्ति विधानसभा मतदारसंघात येते. जो नागरकर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वनपर्ति संस्‍थान संपादन

वनपर्ति संस्‍थान किंवा वनपर्तिचा राजा हा हैदराबादच्‍या निजामाचा जामिनदार होता. वनपर्तिच्या सरंजामशाहीवर त्यांनी नियंत्रण ठेवले.

वाहतुक संपादन

वनपर्ति येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. वनपर्ति हे शहर राष्ट्रीय महामार्ग ४४ या महामार्गाद्वारे सुगम आहे.

जवळचे रेल्वे स्टेशन हे वनपर्ति रोड रेल्वे स्टेशन आहे.

शिक्षण संपादन

तेलंगणातील पहिले तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्निक कॉलेज) कृष्ण देव राव शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय (के.डी.आर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) वनपर्थी येथे सुरू झाले.[]

हे देखाल पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी