Jump to content

आषाढी एकादशी

मराठीपिडिया कडून

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात.[] तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात.

तिथीची वृद्धी[संपादन | स्रोत संपादित करा]

देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

देवशयनी एकादशी[संपादन | स्रोत संपादित करा]

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.[] हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.[] या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.[]

पंढरपूर वारी[संपादन | स्रोत संपादित करा]

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.[] चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

उपवास[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
उपवास पदार्थ

या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.[]

आषाढ वद्य एकादशी[संपादन | स्रोत संपादित करा]

आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.[]

सद्यस्थिती[संपादन | स्रोत संपादित करा]

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात.[] स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

बाह्य दुवा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय सण आणि उत्सव साचा:हिंदू सण

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]