गंगूबाई काठियावाडी (चित्रपट)
गंगूबाई काठियावाडी हा आगामी हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.[१] या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.[२] हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.[३]
कलाकार संपादन
- आलिया भट्ट
- शंतनू माहेश्वरी
- विजय राझ
- इंदिरा तिवारी
- रोहित सुखवाणी
- सीमा पाहवा
बाह्य दुवे संपादन
गंगूबाई काठियावाडी आयएमडीबीवर