Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
चिंतामणी नागेश रामचंद्र राव - मराठीपिडिया

चिंतामणी नागेश रामचंद्र राव

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव (कन्नड: ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ ರಾಮಚಂದ್ರ ರಾಯ ; रोमन लिपी: Chintamani Nagesa Ramachandra Rao / C.N. R. Rao ;) (३० जून, इ.स. १९३४; बंगळूर; कर्नाटक - हयात) हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.

जीवन संपादन

रावांनी इ.स. १९५१ साली म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्रवेश घेतला व इ.स. १९५८ साली पीएच.डी मिळवली. त्यांनी इ.स. १९६३ ते इ.स. १९७६ या काळात कानपुरातील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या रसायनशास्त्र विभागात, तर इ.स. १९८४ ते इ.स. १९९४ या काळात बंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले.

सध्या (इ.स. २०११) ते बंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र येथे संशोधक प्राध्यापक व मानद अध्यक्ष म्हणून काम करतात.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चिंतामणी नागेश रामचंद्र राव (इ.स. २००४ च्या सुमारास)

पुरस्कार संपादन

  • भारतीय केंद्रशासनाने रावांना पद्मश्रीपद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवले आहे.
  • चीनच्या विज्ञान अकादमीचा मानाचा पुरस्कार २०१२[]

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:भारतरत्न