Jump to content

तरन तारन

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट शहर तरन तारन साहिब (पंजाबी: ਤਰਨ ਤਾਰਨ ਸਾਹਿਬ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक शहर व तरन तारन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तरन तारन शहर पंजाबच्या वायव्य भागात अमृतसरच्या २ किमी दक्षिणेस वसले आहे. तारन तरनची स्थापना पाचवे शीख धर्मगुरू गुरू अर्जुनदेव ह्यांनी केली. तरन तारन शीख धर्माचे व शीख संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र असून भारताच्या फाळणीवेळी पंजाबातील बहुसंख्य शीख रहिवासी असलेल्या मोजक्या गावांपैकी ते एक होते.

१९८० च्या दशकात चालू असलेल्या खलिस्तान चळवळीचे तरन तारन केंद्र होते. सध्या तरन तारन एक कृषीप्रधान शहर आहे.

पठाणकोट ते गुजरात दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १५ तरन तारनमधून जातो. तसेच तरन तारन रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक असून येथून अनेक डेमू गाड्या सुटतात.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]