नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

साचा:माहितीचौकट विमानतळ नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे.

डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे.

इतिहास संपादन

कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीनऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एअर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एअरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली

गंतव्यस्थाने संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग