Jump to content

फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र

मराठीपिडिया कडून

साचा:Photomontage फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र हे भारतीयांचे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांचे एक घोषवाक्य आहे. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला "पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र" म्हटले जाते. या तीन व्यक्तींनी उपेक्षितांच्या 'शिक्षण व हक्कासाठी' संघर्ष केला. 'फुले-शाहू-आंबेडकर' या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारणात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो.[][][]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर