यश पाल (शिक्षणतज्ज्ञ )
जीवन संपादन
प्राध्यापक यशपाल (जन्म : २६ नोव्हेंबर १९२६, - नॉयडा, २४ जुलै २०१७) हे एक भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी मधून याच विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केली.
महत्त्वाची पदे संपादन
यश पाल यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढीलप्रमाणे आहेत :
- योजना आयोग - मुख्य सल्लागार (१९८३-१९८४)
- विज्ञान व टेक्नाॅलॉजी विभागात सचिव (१९८४-१९८६)
- विद्यापीठ अनुदान आयोग - अध्यक्ष (१९८६-१९९१)
प्रा. यशपाल हे दूरदर्शनवरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम-टर्निंग पॉईंटमधून साध्या शब्दांत सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या कामामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.
पुरस्कार आणि सन्मान संपादन
- यशपाल यांना भारत सरकारकडून इ.स. १९७६मध्ये विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- कलिंग पुरस्कार
- लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार
- पद्मविभूषण पुरस्कार[१] (इ.स. २०१३)
मृत्यूपूर्वीचे काही दिवस आधी ते नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते.