योगीराज बागूल
साचा:माहितीचौकट साहित्यिक योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करून आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावच्या जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.साचा:संदर्भ हवा त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.साचा:संदर्भ हवा
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे वरिष्ठ अधिकारी पदावर नोकरी करीत आहेत.साचा:संदर्भ हवा
भूषवित असलेली पदे[संपादन | स्रोत संपादित करा]
- अजीव सभासद - मुंबई मराठी साहित्य परिषद
- अजीव सभासद - कोकण मराठी साहित्य परिषद,
- सदस्य - डाँ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.
- सदस्य - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंतर्गत सजावट समिती, ऐरोली, नवी मुंबई.
- सदस्य - स्मृतिशेष घनःशाम तळवटकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, मुंबई.
साहित्यनिर्मिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बागूल यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:[१]
- प्रिय रामू, चरित्र (ग्रंथाली-मुंबई)[२]
- सोयरिक (काव्यसंग्रह-मृदगंधा प्रकाशन,भोसरी,पुणे)
- ही वाट सुनसान कशी? काव्यसंग्रह (ग्रंथाली-मुंबई)
- पाचट आत्मचरित्र (ग्रंथाली-मुंबई)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१ वैचारिक (ग्रंथाली-मुंबई)
- तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा, चरित्र (ग्रंथाली)
- आठवणीतले बाबासाहेब,व्यक्तिचित्र (ग्रंथाली-मुंबई)
- डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स (इंग्रजी-अनोखी प्रकाशन)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी सहकारी भाग-2 वैचारिक,(ग्रंथाली-मुंबई)
- 'यादें बाबासाहेब की' (हिंदी भाषेत) सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली
समाजभान[संपादन | स्रोत संपादित करा]
महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याणें
स्फुट लिखाण[संपादन | स्रोत संपादित करा]
- आरसपाणी (जेष्ठ लेखक वामन होवाळ यांचा अमृतमहोत्सवी अंक)- लेख
- आठवींतले डाँ.गंगाधर पानतावणे-संपादक वैभव काळखैर (परिवर्तण प्रकाशन) - लेख
- महामानव - संपादन अँड. विश्वास कश्यप - लेख
- आंबेडकरी चळवळीचा शिलेदार अमृतमहोत्सवी गौरवांक) मलपृष्ठी मचकूर
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
आगामी[संपादन | स्रोत संपादित करा]
- वामनदादा कर्डक (संपूर्ण जीवनचरित्र)
- डाॅ.आंबेडकरांच्या चळवळीतील तत्कालीन महिलांचे योगदान
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी (भाग-३)