रमाकांत आचरेकर
साचा:माहितीचौकट व्यक्ती रमाकांत आचरेकर (१९३२ - २ जानेवारी २०१९) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी अनेक क्रिकेटरांना घडवले.
प्रशिक्षकी कारकीर्द संपादन
आचरेकरांच्य मार्गदर्शनाखाली तयार झालेले व सध्या खेळत असलेल्या काही खेळाडूंची नावे
पुरस्कार संपादन
- इ.स. १९९० मध्ये, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला गेला[३]
- फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.[४]
- ७ एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[५]
- १३ फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी 'अचीव्हमेंट ऑफ अ लाइफटाइम' देऊन सन्मानित केले. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडने क्रीडा क्षेत्रातील विविध वर्गातील दिलेल्या पुरस्कारातील हा एक पुरस्कार आहे.[६]
आजारपण आणि मृत्यू संपादन
रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळातील आजारांमुळे २ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडू त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित होते.।[७]