लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
साचा:Infobox Airport लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.
सुरक्षा संपादन
काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलीस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
हे सुद्धा पहा संपादन
- कामदो बांग्दा विमानतळ - ४,३३४ मी उंचीवरील जगातील सगळ्यात उंच प्रवासी विमानतळ
- एल आल्तो आंतरराष्ट्रीय विमानतळ - ४,०६१ मी उंचीवरील प्रवासी विमानतळ