वीर सावरकर (चित्रपट)
Appearance
वीर सावरकर हा २००१ मधील विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे.[१] ही आवृत्ती डीव्हीडी स्वरूपात प्रसिद्ध केली गेली. हा चित्रपट सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांनी निर्मिती झाली.[२] सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर २००१ रोजी मुंबई, नवी दिल्ली, नागपूर आणि इतर सहा शहरांमध्ये याचा प्रीमियर झाला.[३] २८ मे २०१२ रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजराती भाषेची आवृत्ती प्रकाशित केली.