वैशाख
वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.
सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.
वैशाख महिन्यातील सण संपादन
- वैशाख शुद्ध तृतीया-अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती.
- वैशाख शुद्ध पंचमी-आद्य शंकराचार्य जयंती, रामानुजाचार्य जयंती, सूरदास जयंती..
- वैशाख शुद्ध अष्टमी -बगलामुखी जयंती
- वैशाख शुद्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी)-नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती.
- वैशाख पौर्णिमा-बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती,
- वैशाख कृष्ण प्रतिपदा-नारद जयंती.
- वैशाख अमावस्या-शनैश्चर जयंती.
कालबैसाखी संपादन
पश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.
टोपणनाव संपादन
- वैशाख हे त्र्यं.वि. देशमुख नावाच्या मराठी कवीचे टोपणनाव आहे.
साचा:भारतीय दिनदर्शिका महिना साचा:भारतीय महिने साचा:हिंदू कालमापन