सिद्दिपेट जिल्हा
साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा
सिद्दिपेट हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. करीमनगर आणि वरंगल जिल्ह्यांचा काही भाग जोडून पूर्वीच्या मेदक जिल्ह्यापासून सिद्दीपेट जिल्हा तयार करण्यात आला आहे. हा जिल्हा तेलंगणाच्या मध्य भागात असून ह्या जिल्ह्याचा काही भाग हैद्राबाद महानगरामध्ये मोडतो. सिद्दिपेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१]
प्रमुख शहर[संपादन | स्रोत संपादित करा]
भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]
सिद्दिपेट जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,६३२ चौरस किलोमीटर (१,४०२ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा यदाद्रि भुवनगिरी, जनगांव, राजन्ना सिरिसिला, करीमनगर, कामारेड्डी, हनमकोंडा, मेडचाल-मलकाजगिरी आणि मेदक जिल्ह्यांसह आहेत. येर्रा आणि कोमटी, मंजिरा नदीच्या उपनद्या या परिसरातून वाहतात.
प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]
सिद्दिपेट जिल्ह्यात खालील प्रेक्षणीय स्थळे आहेत:
- श्री विद्या सरस्वती शनैश्चरालयम् - वर्गल
- श्री कोंड पोचम्म मंदिर - मर्कूक
- श्री मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम - कोमुरवेल्ली
- श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर - नाचारम
- कोमटी तलाव(मिनी टँक बंद) - सिद्दिपेट
- कोटी लिंगेश्वर स्वामी मंदिर-सिद्दिपेट
- श्री रेणुका इल्लम्मा मंदिर-सिद्धीपेट
- स्वयंभू शंभू लिंगेश्वरा स्वामी मंदिर
- नागदेवता मंदिर- सिद्दिपेट
- रंगनायक सागर जलाशय - चिन्नकोदूर
- शनिगरम जलाशय - शनिगरम
- श्री सरस्वती क्षेत्र मुख्य मंदिर - अनंतसागर
- लकुदारम तलाव - लकुदारम
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या सिद्दिपेट जिल्ह्याची लोकसंख्या १०,१२,०६५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १००८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.६१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १३.७४% लोक शहरी भागात राहतात.
मंडळ (तहसील)[संपादन | स्रोत संपादित करा]
सिद्दिपेट जिल्ह्या मध्ये २४ मंडळे आहेत: सिद्दिपेट, गजवेल आणि हुस्नाबाद हे तीन महसुल विभाग आहेत.[२]
| नुक्रम | सिद्दिपेट महसूल विभाग | अनुक्रम | गजवेल महसूल विभाग | अनुक्रम | हुस्नाबाद महसूल विभाग |
|---|---|---|---|---|---|
| १ | सिद्दिपेट शहरी | १२ | गजवेल | १९ | हुस्नाबाद |
| २ | सिद्दिपेट ग्रामीण | १३ | वर्गल | २० | मद्दूर |
| ३ | चिन्नकोदूर | १४ | मुलुगु | २१ | अक्कन्नपेट |
| ४ | नांगनूर | १५ | जगदेवपूर | २२ | कोहेडा |
| ५ | दुब्बाक | १६ | मर्कूक | २३ | बेज्जंकी |
| ६ | दौलताबाद | १७ | कोंडपाक | २४ | धुलमिट्टा |
| ७ | मिरुदोड्डी | १८ | रायपोल | ||
| ८ | तोगुटा | ||||
| ९ | कोमुरवेल्ली | ||||
| १० | चेरियाल | ||||
| ११ | नारायणरावपेठ |