कमल हासन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट अभिनेता कमल हासन (तमिळ: கமல் ஹாசன்) (७ नोव्हेंबर, इ.स. १९५४ - हयात) हे तमिळहिंदी चित्रपट-अभिनेते, पटकथालेखक व दिग्दर्शक आहेत. १२ ऑगस्ट, इ.स. १९५९ रोजी चित्रपटगृहांत झळकलेल्या कलतूर कन्नम्मा या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी कमल हासन यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. इ.स. १९७५ सालच्या अपूर्व रागांगल या तमिळ चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेद्वारे तरुणपणी त्यांचा चित्रपटक्षेत्रात पुनःप्रवेश झाला. त्यांनी अभिनय केलेले मूंद्रम पिरै (इ.स. १९८२), नायगन (इ.स. १९८७), हे राम (इ.स. २०००), विरुमांदी (इ.स. २००४), दशावतारम्‌ (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.

कमल हासनांच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत तर त्यांनी काही चित्रपट मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. २०१३ सालापर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

पुरस्कार

  • मामि (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) या संस्थेच्या महोत्सवात मिळालेला जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
  • पद्मश्री पुरस्कारासह तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता

साचा:विस्तार