गुरुपुष्य योग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३].

महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते.

सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर.
सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट
सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर.

यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो.

संदर्भ

साचा:संदर्भयादी