नितीश राणा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट नितीश राणा (जन्म - २७ डिसेंबर, १९९३:दिल्ली) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा अंतर्देशीय स्पर्धांमध्ये दिल्लीकडून खेळतो[१]. तो एक अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला दिल्लीचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले[२].

कारकीर्द

राणाने २०१५-२०१६ मधील रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी भारत अ संघात स्थान देण्यात आले होते. ऑक्टोबर२०१९ मध्ये, त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी इंडिया बीच्या संघात स्थान देण्यात आले[३].

संदर्भ