Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
पंडित जसराज - मराठीपिडिया Jump to content

पंडित जसराज

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक पंडित जसराज (जन्म : २८ जानेवारी १९३०, पिली मांदोरी, जिल्हा: हिस्सार, हरियाणा[]; - १७ ऑगस्ट २०२०,न्यू जर्सी-अमेरिका[]) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत.

बालपण[संपादन | स्रोत संपादित करा]

पंडित जसराज यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. जसराज चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. जसराजांनी सुरुवातीला तबल्याचे शिक्षण घेतले. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांच्याकडून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रथम गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात मेवाती घराण्याची गायकी होती. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत.

शिष्य[संपादन | स्रोत संपादित करा]

पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, शहनाई वादक लोकेश आनंद, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत. १९९५ मध्ये त्यांनी पंडिता तृप्ती मुखर्जी यांच्याबरोबर न्यू जर्सी येथे पंडित जसराज इन्स्टीट्यूट फॉर म्युझिकची स्थापना केली.[]

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संदर्भनोंदी साचा:संगीतातील अपूर्ण लेख