पहिला बहादूर शाह
बहादूर शाह पहिला (साचा:Lang-tr, साचा:Lang-fa Bahādur Shāh) (१४ ऑक्टोबर, इ.स. १६४३:बुरहानपूर – २७ फेब्रुवारी, इ.स. १७१२:लाहोर) हा एक मुघल सम्राट होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा म्हणून तो १७०७ मध्ये मुघल साम्राज्याच्या गादी वर बसला. त्याने इ.स. १७०७ ते इ.स. १७१२ दरम्यान भारतावर राज्य केले. यालाच मुअज्जम किंवा शाह आलम पहिला या नावांनीही ओळखले जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुअज्जम आणि औरंगजेबाचा दुसरा मुलगा मोहम्मद आज्जम यांच्यात सामुगढ जवळील जाजाऊ येथे लढाई होऊन त्यात मुअज्जम विजयी ठरला. साचा:विस्तार