राजाराम द्वितीय
साचा:इतिहासलेखन साचा:माहितीचौकट राज्याधिकारी
दुसरे राजाराम (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) हे १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० पर्यंत कोल्हापूर संस्थानचे राजा होते. तिसऱ्या शिवाजींना औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील दुसऱ्या राजारामला दत्तक घेतले. हा मोठा देखणा, शहाणा आणि इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा केली. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे. इटलीतील मंत्र्यांच्या परवानगीने अरव नदीच्या काठावरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे शिवाजी सहावा गादीवर आला.