रामभद्राचार्य

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:अशुद्धलेखन

जगद्गुरू रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत.[१]

जगद्गुरू रामभद्राचार्य प्रवचन देत असतांना

ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[२][३][४] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[५] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[६][७] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[२][३][८][९] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[८][१०][११] ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[१२] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[९][१३][१४] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१५] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१६][१७][१८][१९][२०][२१]

संदर्भ

साचा:अनुवादसंदर्भ साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:अशुद्धलेखन

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. २.० २.१ साचा:जर्नल स्रोत
  3. ३.० ३.१ अग्रवाल २०१०, पृष्ठ ११०८-१११०।
  4. दिनकर २००८, पृष्ठ ३२।
  5. नागर २००२, पृष्ठ ९१।
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:स्रोत पुस्तक
  8. ८.० ८.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. ९.० ९.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. दिनकर २००८, पृष्ठ ३९।
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. दिनकर २००८, पृष्ठ ४०–४३।
  13. प्रसाद १९९९, पृष्ठ xiv: "Acharya Giridhar Mishra is responsible for many of my interpretations of the epic. The meticulousness of his profound scholarship and his extraordinary dedication to all aspects of Rama's story have led to his recognition as one of the greatest authorities on Tulasidasa in India today ... that the Acharya's knowledge of the Ramacharitamanasa is vast and breathtaking and that he is one of those rare scholars who know the text of the epic virtually by heart." (मेरे द्वारा इस ग्रंथ के किए गए अनेकानेक अर्थों के पीछे आचार्य गिरिधर मिश्र की प्रेरणा है। उनके गहनतम पाण्डित्य का अवधान और रामायण के सभी पक्षों के प्रति उनकि विलक्षण लगन के कारण आज वे भारत में तुलसीदास पर सर्वश्रेष्ठ विशेषज्ञों में अग्रगण्य हैं। ... आचार्य का रामचरितमानस का ज्ञान व्यापक और आश्चर्यजनक हैं, और वे उन विरल विद्वानों में से हैं जिन्हें यह ग्रन्थ पूर्णतः कण्ठस्थ है।)
  14. साचा:स्रोत पुस्तक
  15. रामभद्राचार्य (ed) २००६।
  16. साचा:संकेतस्थळ स्रोत
  17. साचा:संकेतस्थळ स्रोत
  18. साचा:संकेतस्थळ स्रोत
  19. साचा:संकेतस्थळ स्रोत
  20. साचा:संकेतस्थळ स्रोत
  21. साचा:संकेतस्थळ स्रोत