वरखेडी
वरखेडी हे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पाचोरे या शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पाचोरा-जामनेर (राज्य महामार्ग क्र. १९) रस्त्यावर वसलेले गाव आहे.
स्थान संपादन
वरखेडी हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्यात पाचोरे या शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पाचोरा - जामनेर रस्त्यावर वसलेले आहे. हे गाव वरखेडी बु. व वरखेडी खुर्द असे विभागले आहे. वरखेडी बु. व वरखेडी खुर्द या गावांमधून बहुळा ही नदी वाहते.
महत्त्व संपादन
हे तालुक्यातील बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे. येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे.