विजय मर्चंट
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती विजयसिंग माधवजी मर्चंट तथा विजय माधवजी ठाकरसी (१२ ऑक्टोबर, इ.स. १९११ - २७ ऑक्टोबर, इ.स. १९८७) हे साचा:Crकडून दहा कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. उजखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या मर्चंट यांनी इ.स. १९२९ ते इ.स. १९५१ दरम्यान मुंबईसाठी प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांची फलंदाजीची सरासरी ७१.६४ ही प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील डॉन ब्रॅडमननंतरची दुसरी सर्वोच्च सरासरी आहे.
त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन इंग्लंड दौरे केले ज्यामधे त्यांनी ४००० पेक्षा जास्ती धावा केल्या. इंग्लिश क्रिकेटपटू सी.बी. फ्राय म्हणाला होता की "Let us paint him white and take him with us to Australia as an opener." त्यांचे भाऊ उदयसुद्धा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत.
क्रिकेट व्यतिरिक्त ते ठाकरसी ग्रूपच्या हिंदुस्तान स्पिनिंग व वीविंग मिल्सशी संलग्न होते.
कौटुंबिक माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
मर्चंट यांचा जन्म इ.स. १९११ मध्ये मुंबईमध्ये एका श्रीमंत घरात झाला.