विवेकसिंधु
Appearance
विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला. हरिहरनाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास 'मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा' अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले. त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा येथे बसून हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० सालातील असावी.[१] या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे.
ओवी[संपादन | स्रोत संपादित करा]
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- जैतपाळ
- या लेखाचे चर्चापान